Club
वाचन संस्कृती मंडळ हा वाचनाच्या प्रचारासाठी समर्पित कट्टा आहे. हा कट्टा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय लावण्याचा आणि साहित्यात रस निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विभागाच्या वतीने हा कट्टा सुरू करण्यात आला असून या कट्ट्याला तयार करण्यासाठी विद्यार्थिनींची महत्त्वपूर्ण भागीदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थिनींनी व शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक ग्रंथ या वाचन कट्ट्याला भेट देण्याची प्रथा निर्माण करण्यात आलेली आहे. वर्षभर विद्यार्थिनींमध्ये चालविण्यासाठी विद्यार्थिनींचेच एक संपादक मंडळ तयार करण्यात आले आहे. हे संपादक मंडळ वर्षभर विद्यार्थिनींमध्ये वाचनाची प्रेरणा व साहित्यिक रुची निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. विभागातील शिक्षक कर्मचारी पालक म्हणून या गटातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतात.