About Marathi Department
श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाची स्थापना इ.स.१९८५ मध्ये झाली. या शिक्षण संस्थेत स्थापनेपासूनच मराठवाड्यातील मुली शिक्षण घेतात. महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच अनेक विषयांचे विभागही सुरु झाले. त्यातीलच एक मराठी विभाग आहे. हा विभाग सुरुवातीपासूनच अ जिल्ह्यातील प्रतिभावंत चिकित्सक अभ्यासक होते. त्यांनी महावितिशय समृद्ध असा वाङमयाभिरुची निर्माण करण्यात अग्रेसर राहिलेला विभाग आहे. या विभागाचे सर्वप्रथम विभाग प्रमुख डॉ. केशव देशमुख हे होते. डॉ. देशमुख हे तत्कालामध्ये जालनाद्यालयाच्या स्थापनेबरोबरच मराठी विभागाची पायाभरणी मजबूत केली. त्यामुळे मराठी विभागातून अनेक प्रतिभावंत साहित्यिक, अभ्यासक निर्माण झालेले आहेत.
आजमितीला मराठी विभागाने समाजासमोर गुणवत्तेचा एक आदर्श निर्माण केलेला आहे. राष्ट्रीय सेवा योजना व विविध सामाजिक अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मराठी विभाग कायमच समाजाशी बांधला गेला आहे. तसेच समाजातील साहित्य, रसिक व विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी सातत्याने विविध वाङमयीन उपक्रमाचे आयोजन करीत आहे. मराठी भाषेची अंगभूत वैशिष्ट्ये कायम ठेऊन भाषासमृद्धीसाठी भाषांतरे, नव्या शब्दांचा स्वीकार, प्रतिशब्दांची निर्मिती, अभिजात व समकालीन साहित्यचर्चा आणि ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील पायाभूत व मौलिक प्रवृत्तिप्रवाह मराठीत आणण्यासाठी व वाङमयाच्या अभिरुचीपासून ते आजच्या स्पर्धायुक्त गतिमान कालखंडात विद्यार्थ्यांच्या हितासाठी विभाग कटिबद्ध आहे.
श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयातील मराठी भाषा व वाङमय विभागाची सुरुवात इ.स. १९८५ मध्ये झालेली आहे.
भाषा आणि साहित्य संशोधनाला प्रोत्साहन, भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्ये, साहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे.
विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास व सुप्त गुणांचा शोध घेऊन विद्यार्थ्यात साहित्य विषयक जाणिवा व संशोधन दृष्टीचा विकास करणे.