Best Practices
अभ्यास सहल हा एक शैक्षणिक अनुभव आहे जो विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर पडून वास्तविक जगात प्रवेश करण्याची संधी देतो. हा एक असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थी एखाद्या खास ठिकाणी भेट देतात. (बाजार समिति , कारखाना, आद्योगीक, व्यापारी संकुल ,लघु उद्योग, बँक सेक्टर, कृषि विभाग व तत्सम ) या अभ्यास सहलींचे उद्दिष्ट वर्गाबाहेर विद्यार्थ्यांचे ज्ञान व्यावहारिक वाढविणे तसेच त्यांची ज्ञानाबद्दलची उत्सुकता वाढवणे आहे. वर्गाध्यापनातून ग्रहण केलेल्या सैद्धांतिक ज्ञानाचा व्यावहारिक पातळीवर उपयोजन करता येणे. तसेच वर्गात शिकवले जाणारे ज्ञान या सहलीदरम्यान प्रत्यक्ष जीवनात पाहता आणि समजता येते. पुस्तकांमध्ये वाचलेली माहिती प्रत्यक्ष अनुभवातून अधिक खोलवर समजून घेता येणे. विद्यार्थ्यांना नवीन विषय आणि कल्पनांशी परिचित होण्याची संधी मिळते. वर्ग मित्रांसोबत एकत्र काम केल्याने गटकार्य आणि संवाद कौशल्ये विकसित होतात. शिकण्यासोबतच विद्यार्थ्यांना मनोरंजन देखील मिळते, ज्यामुळे त्यांची अभ्यासात रुची वाढते.
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांनीसाठी ‘अनुभूती अध्ययन’ या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन अध्ययनाचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थिनींना प्रत्यक्ष स्थळावर घेऊन जाऊन अभ्यासक्रमाशी संबंधित सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अशा द्विस्तरीय अध्ययन पद्धतीतून शिकण्याचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणात येऊ घातलेला प्रात्यक्षिक व सैद्धांतिक अशा दोन्ही अध्ययनानुभूतीचा मेळ घालण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम विभागाद्वारे दरवर्षी आयोजित केला जातो. शिवाय विद्यार्थिनींच्या अध्ययनाला अनुभूतीचे पंख लागल्याने आकलन अधिक दृढ होते.