1. मही वार्षिकांक:
विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला आणि निर्भेळ अभिव्यक्तीला वाव मिळावा म्हणून महाविद्यालयात
'युवती-दर्पण' हे भित्तीपत्रक चालविले जाते. त्याचीच मोठी प्रतिकृती म्हणजे 'मही'. मराठी, हिन्दी व
इंग्रजीतून व्यक्त होणाऱ्या विद्यार्थिनीच्या विचारांना अभिव्यक्त करण्याची संधी यातून मिळेल.
प्राचार्य व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध
पैलूंच्या अभिव्यक्तीचे हे माध्यम ठरावे, अशी अपेक्षा.
2. वार्षिक माहिती पुस्तिका:
दरवर्षी श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या वतीने वार्षिक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले
जाते. ज्यामध्ये महाविद्यालयासंबंधीत इत्यंभूत वार्षिक माहितीचा आढावा वाचकांना घेता येऊ शकतो.
यात उपलब्ध अभ्यासक्रम, प्रवेशाबाबत सूचना, महाविद्यालयातील सोयीसुविधा, शिष्यवृत्ती व इतर सवलती,
महाविद्यालयात राबविले जाणारे विविध उपक्रम, क्लब, रोजगार संबंधी माहिती, गुणवत्ताधारक
विद्यार्थिनींची माहिती, विद्यापीठाच्या रँक होल्डर्स विद्यार्थिनींची माहिती, यासोबतच शैक्षणिक
दिनदर्शिका, महाविद्यालयीन कार्यक्रमांसंदर्भात सखोल माहिती वाचकांना उपलब्ध करून दिले जाते.
3. ई-माहिती पुस्तिका (E-Prospectus):
महाविद्यालयाची इत्यंभूत माहिती देणारी ई-माहिती पुस्तिका खालील लिंकवर उपलब्ध आहे:
Prospectus 2025-26
Prospectus 2024-25